Ad will apear here
Next
मुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त
सुश्री फाउंडेशन व वंचित विकास आयोजित उपक्रम

पुणे : मोबाइलच्या जगात हरवून जाणारी मुले...गोष्ट वाचताना, त्यातील नाट्य उलगडताना हरवून गेली होती. निमित्त होते, सुश्री फाउंडेशन, वंचित विकास व नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित ‘गोष्टींचा गाव’ या विशेष कार्यक्रमाचे.

वीस वर्षांपूर्वी जादूच्या गोष्टीची निर्मिती करून भारतासह अमेरिकेतील लोकांना जादूच्या गोष्टीत रमवणारे प्रकाश पारखी यांनी मुलांच्या या गोष्टींच्या गावात आठवणींना उजाळा देत मैफल रंगवली. आजकालची लहान मुले मैदानी खेळ खेळताना, गोष्टीची पुस्तके वाचताना दिसत नाहीत. मोबाइलच्या दुनियेत गोष्टी ऐकल्या जातात. मात्र, त्यांचे वाचन होत नाही. गोष्टीची पुस्तके वाचण्याची मजा ते आज गमावून बसलेली दिसत आहेत, अशावेळी हा कार्यक्रम मुलांचे क्षितिज विस्तारणारा ठरला आहे. मुलांनी कथांचे अभिवाचन केले, तर नाट्यसंस्कारचे विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ‘जादूचे घर'’ दाखवले.

वंचित विकास संस्थेच्या अभिरुची गटातील मधुमिता सोनवणे, उमेश लोहार, आयेशा शेख, प्राजक्ता क्षीरसागर, प्रणिता गाडे यांनी ‘निर्मळ रानवारा’ या मासिकातील काही कथांचे अभिवाचन केले, तर नाट्यसंस्कारच्या वेदांत गोळवलकर, आयुष परांजपे, अवनी ताम्हाणे यांनी ‘खारीच्या वाटा’ या कथेच्या संपादित अंशाचे अभिवाचन केले. श्रीजय देशपांडेंनी नाट्यछटा सादर केल्या. या वेळी ‘निर्मळ रानवारा’ या बालमासिकाच्या ‘नाट्यछटा’ विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले.

वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘खारीच्या वाटा’चे लेखक ल. म. कडू, निर्मळ रानवाराचे व्यवस्थापक स्नेहल मसालिया, सल्लागार ज्योती जोशी, सरोज टोळे, ललितगौरी डांगे, सुप्रिया जोगदेव आणि लहान मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम ओक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला होता. त्याचे प्रास्ताविक ओक यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZYJCC
Similar Posts
‘एकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये’ पुणे : ‘आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्न न करणाऱ्या, घटस्फोटित अथवा विधवा अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांकडे समाजात वेगळ्या नजरेने पहिले जाते. त्यांना नानाविध समस्यांचा सामनाही करावा लागतो; पण महिलांनी आपल्या एकटेपणाचा न्यूनगंड न बाळगता मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आव्हानांचा सामना
‘पालकच मुलांचे खरे मार्गदर्शक’ पुणे : ‘लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी त्यांना आत्मविश्वासाची आवश्यकता असते. पालकांनी मुलांच्या या वाढत्या वयात त्यांच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागते’, असे मत डॉ. राजीव तांबे यांनी व्यक्त केले. गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘आय पेरेंट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. या
‘वंचित विकास’तर्फे संघर्ष करणाऱ्या महिलांचा सन्मान पुणे : निर्भयपणे स्मशानात काम करणाऱ्या मालतीताई, स्वतःची किडनी नवऱ्याला देऊन रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारी एकता, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सोनालीताई, दोन महिन्यात जवळची सहा माणसे गमावल्यानंतर पुन्हा उभ्या राहणाऱ्या संध्याताई.. अशा कष्ट करून आपल्या
‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’ पुणे : ‘विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शालेय ज्ञानाबरोबरच चांगले संस्कार द्यायला हवेत. विद्यार्थिदशेतच त्यांच्यातील समाजभान जागृत झाले, तर समाजासाठी योगदान देण्याची मनोवृत्ती विकसित होईल. माणसांशी आपुलकीने वागत परस्परांतील दुरावा कमी केला, तर समृद्ध समाज आपल्याला मिळू शकेल,’ असे मत उद्योजक मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language